Chandrayaan-3: विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर यशस्वीरित्या चंद्रावर उतरला
भारताची चांद्रयान मोहिम यशस्वी झाली आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले आहे. संध्याकाळी 06 वाजून 04 मिनिटांनी चांद्रयानने दक्षिण ध्रुवाला स्पर्श केला आहे. यासोबतच भारताने इतिहास रचलेला आहे. यानिमित्त अवघ्या देशाकडून इसरोवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
आता बुधवारी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. त्यानंतर २ तास २६ मिनिटांनी प्रज्ञान रोव्हर लँडरमधून बाहेर आलं आहे. या रोव्हरच्या चाकांवर अशोक स्तंभ आणि इस्रोचं चिन्ह कोरण्यात आलं आहे. हा रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर चालला की तिथल्या पृष्ठभागावर अशोक स्तंभ आणि इस्रोच्या खुणा उमटणार आहे चांद्रयान १ या मोहिमेच्या वेळी चंद्रावर पाण्याचे अंश आढळले आहेत. आता रोव्हर प्रज्ञान काय माहिती पाठवणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांचं आयुष्य १४ दिवसांचं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हे काम करणार आहेत.
धूळ खाली बसण्याआधी रोव्हर बाहेर काढला गेला असता तर त्यावरील कॅमेरे, उपकरणांना नुकसान झाले असते. हे रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर जसे जसे पुढे जाईल तसे तसे ते भारताच्या पाऊल खुणा चंद्रावर सोडेल. हा रोव्हर पुढील १४ दिवस चंद्रावर संशोधन करणार आहे. लँडर चंद्रावर उतरल्यानंतर सुमारे अडीच तासांनी रोव्हर बाहेर काढण्यात आले.