Europe Trip : स्वप्नातील युरोप यात्रा… 10 लाखाचा कटापटात झाला दु:स्वप्न! Viral Video ने उघड केली हकीकत
युरोपचं स्वप्नवत चित्र वेगळंच असल्याचं दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. भारतीय प्रवासी व व्हिडीओ क्रिएटर प्रतीक सिंग यांनी युरोपमधील काही शहरांतील अस्वच्छ रस्ते, गर्दी आणि गोंधळ दाखवणारे दृश्य शेअर केले आहेत. या व्हिडीओमुळे अनेकांनी युरोपविषयीच्या कल्पनांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
सिंग यांच्या मते, महागडा व्हिसा, कागदपत्रांची पूर्तता आणि मोठा खर्च करूनही अनेक ठिकाणी अपेक्षित अनुभव मिळत नाही. त्यांनी सांगितले की, अशा गोष्टी भारतातही पाहायला मिळतात. त्यांच्या मते, सध्या आशियातील काही देश पर्यटन, सुविधा आणि प्रगतीच्या बाबतीत आघाडीवर आहेत.
या व्हिडीओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी युरोपमधील स्वच्छतेवर टीका केली, तर काहींनी सर्वच ठिकाणी परिस्थिती वाईट नसल्याचं मत मांडलं. त्यामुळे हा व्हिडीओ केवळ व्हायरलच नाही, तर जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे.
थोडक्यात
युरोपचं स्वप्नवत चित्र प्रत्यक्षात वेगळं आहे.
भारतीय प्रवासी आणि व्हिडिओ क्रिएटर प्रतीक सिंग यांनी युरोपमधील वास्तव दाखवलं.
व्हिडिओमध्ये अस्वच्छ रस्ते, गर्दी आणि गोंधळ दिसतो.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
अनेकांनी युरोपविषयीच्या पूर्वग्रहांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

