Nagpur Violence : नागपुरातील दंगलीवरुन RSSने टोचले विहिंपचे कान, संघाची भूमिका काय?
सध्या राज्यभरात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा जोर धरुन आहे. या वादामुळे काल नागपुर येथे दोन गटात दंगल पेटलेली पाहायला मिळाली. तसेच ही दंगल एवढी तीव्र होती की, दोन्ही गटाकडून दगडफेक तसेच गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. या दंगलीमध्ये काही नागरिक आणि अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली.
काल नागपुरात रात्री महाराजांचं पुतळा या परिसरात तसेच इतर परिसरात दगड फेक करण्यात आली त्याचसोबत गाड्यांची जाळपोळ देखील करण्यात आली. एवढच नव्हे तर अग्निशान दलाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण देखील करण्यात आली. याचपार्श्वभूमिवर आता RSS संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
RSS संघाची भूमिका काय?
RSS संघ कोणत्याही हिंचे समर्थन करत नाही. औरंगजेब कबरीवरुन आंदोलन करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेचे RSS संघाने कान टोचले आहेत. औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही, नागपूर तणावानंतर RSS संघाची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या राज्यात चालू असलेली दंगल ही आपल्या समाजासाठी चांगली नाही आहे. पोलिस त्याचं काम करत आहेत असं मला वाटत आहे. ते आपल्याला पुर्ण माहिती देतील. अशी प्रतिक्रिया दिली आहे.