Mohan Bhagwat
Mohan BhagwatTeam Lokshahi

"येत्या १५ वर्षांत अखंड भारत बनेल, जे आडवे येतील ते नष्ट होतील"

सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नवा वाद उभा राहिला आहे.
Published by :
Sudhir Kakde

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या एक नवा वाद निर्माण झाला आहे. येणाऱ्या १५ वर्षांत भारत हा अखंड भारत बनेल. आपण सर्वजण आपल्या डोळ्याने हे चित्र पाहू, सनातन धर्म हाच हिंदूराष्ट्र (Hindurashtra) आहे. आमच्या मनात कुणाबद्दल द्वेष नाही, आम्ही हे काम अहिंसेच्या मार्गाने, मात्र तरीही हातात लाठी घेऊ. तसंच जे लोक या कामात आडवे येतील ते नष्ट होतील असंही ते पुढे म्हणाले आहेत.

Mohan Bhagwat
उद्या ठाकरे परिवाराचा आणखी एक घोटाळा जनतेसमोर आणणार

संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा अखंड भारताबद्दल मोठं विधान केलं आहे. सनातन धर्म हाच हिंदू राष्ट्र आहे, एवढंच नाही तर २० ते २५ वर्षांत भारत अखंड भारत होईल, असंही ते म्हणाले. तसंच जर थोडा प्रयत्न केला तर स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांच्या स्वप्नातील अखंड भारत १० ते १५ वर्षात साकार होईल. त्याला कोणीही रोखू शकणार नाही, जे या मार्गात येतील त्यांचा नाश होईल असं वक्तव्य भागवत यांनी केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com