शिवजयंती साजरी करण्यावरून JNU मध्ये राडा
Admin

शिवजयंती साजरी करण्यावरून JNU मध्ये राडा

शिवजयंती साजरी करण्यावरून जेएनयूमध्ये विद्यार्थी संघटना आणि अभाविपच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला.

शिवजयंती साजरी करण्यावरून जेएनयूमध्ये विद्यार्थी संघटना आणि अभाविपच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची तोडफोड केल्या आरोप अभाविपच्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

एनएनयुआय सचिवांनी सांगितले की, “अभाविपकडून ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची परवानगी घेणं आवश्यक आहे. मात्र, अभाविपने अशी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून शिवाजी महाराजांची प्रतिमा हटवण्यात आली असे ते म्हणाले.

“शिवजयंतीनिमित्त आम्ही स्टुडंट अॅक्टिविटी सेंटर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवली होती. मात्र, एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी ही प्रतिमा बाहेर काढली. तसेच हार कचरापेटीत फेकून दिला. विद्यापीठ प्रशासनाने याविरोधात कठोर कारवाई करावी. अशी मागणी अभाविपचे सचिव उमेशचंद्र अजमेरा यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com