रुद्राक्ष महोत्सवामध्ये चेंगराचेंगरी; मालेगावातील महिलेचा मृत्यू तर बुलडाण्यातील ३ महिला बेपत्ता
Admin

रुद्राक्ष महोत्सवामध्ये चेंगराचेंगरी; मालेगावातील महिलेचा मृत्यू तर बुलडाण्यातील ३ महिला बेपत्ता

मध्यप्रदेशातील सिहोरच्या कुबेश्वर धाम येथे आयोजित 'रूद्राक्ष महोत्सवात चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळत आहे.

मध्यप्रदेशातील सिहोरच्या कुबेश्वर धाम येथे आयोजित 'रूद्राक्ष महोत्सवात चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळत आहे. यात मालेगावातील महिलेचा मृत्यू तर बुलडाण्यातील ३ महिला बेपत्ता झाल्या आहेत. हाशिवारात्रीच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्ताने दर्शनासाठी भाविक जात आहेत.

मध्यप्रदेशातील सिहोर येथे १६ फेब्रुवारीपासून रुद्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे १० लाख भाविक सिहोरमध्ये पोहोचले आहेत.यावेळी रुद्राक्ष घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. या गर्दीतील चेंगराचेंगरी मालेगाव येथील एका महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. तर बुलडाणा जिल्ह्यातील खामगावातील तीन महिला बेपत्ता झाल्याची माहिती आहे. या महिलांशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी खामगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com