जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच 'हे' बदल; लोकांच्या खिशावर होणार थेट परिणाम
Admin

जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच 'हे' बदल; लोकांच्या खिशावर होणार थेट परिणाम

जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक बदल होणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक बदल होणार आहेत. या बदलाच्या परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. 1 जूनपासून इलेक्ट्रिक स्कूटर्स महाग होणार आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीचा खर्च 25,000 ते 30,000 रुपयांनी महाग होणार आहे. अवजड उद्योग मंत्रालयानं 21 मे 2023 रोजी एक अधिसूचना जारी केली होती.

एलपीजी सिलेंडरच्या किमती स्थिर आहेत. जूनमध्ये तेल कंपन्या गॅसच्या किमतींत काही बदल करू शकतात. 1 जूनपासून भारतातून निर्यात केलेल्या सर्व खोकल्याच्या सिरपची अनिवार्यपणे चाचणी केली जाईल.

RBI नं बँकांना प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक बँकेतील किमान 100 अनक्लेम्ड डिपॉजिट ठेवी ग्राहकांना 100 दिवसांच्या आत परत करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच पीएनजी आणि सीएनजीच्या किमतीही बदलल्या जाऊ शकतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com