Rupali Thombre Patil : "आता गाठ माझ्याशी आहे" गुन्हा दाखल केल्यानंतर रुपाली पाटील पोलिसांवर संतापल्या

माधवी खंडाळकर प्रकरणी रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक झाल्या असून रूपाली पाटील खडक पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
Published by :
Prachi Nate

रुपाली पाटील यांच्या बहिणीसह चार जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल खंडाळकर महिलेला रुपाली पाटील यांच्या सांगण्यावरून त्यांच्या बहिणीने मारहाण केल्याचा आरोप केला होता. याबद्दल खंडाळकर यांनी तक्रार दिल्यानंतर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल ही घटना घडल्यानंतर रात्री माधवी खंडाळकर यांनी वीडियो पोस्ट करून आमच्यातील वाद मिटला असे सांगितले होते. मात्र त्यानंतरही त्यांनी तक्रार दिली आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर रुपाली पाटील पोलिसांवर संतापल्या आहेत. यावेळी रुपाली ठोंबरे पाटील काय म्हणाल्या जाणून घ्या...

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com