Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धात भारतीय तरुणाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धात भारतीय तरुणाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

रशिया-युक्रेन युद्धात भारतीय तरुण बिनिल टी. बी. यांचा मृत्यू, जैन टी. के. गंभीर जखमी. केरळमधील वडक्कनचेरी येथील रहिवासी असलेल्या या तरुणांच्या कुटुंबीयांना धक्का.
Published by :
Prachi Nate
Published on

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून युद्ध चालू आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो सैनिक दोन्ही बाजूच्या हजारो नागरिकांनी प्राण गमावले आहेत. दरम्यान, या युद्धात एका भारतीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तसेच त्याचा एक नातेवाईक गंभीर जखमी झाला आहे. मृत तरुणाचं नाव बिनिल टी. बी. असं असून तो ३२ वर्षांचा होता.

बिनिल हा केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील वडक्कनचेरी येथील रहिवासी होता. तर जैन टी. के. (वय २७) हा तरुण जखमी झाला आहे. तो देखील वडक्कनचेरी भागातील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी बिनिलच्या कुटुंबीयांना माहिती मिळाली होती की एका ड्रोन हल्ल्यात केरळमधील दोन तरूण गंभीर जखमी झाले आहेत.

त्यानंतर बिनिलच्या कुटुंबाने अधिक माहिती मिळवण्याचा व बिनिलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना बिनिलची माहिती मिळाली नाही, तसेच त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकला नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com