डोनाल्ड ट्रम्पही भाजपात प्रवेश करतील, त्यांचे 'सूटबूट' भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ होतील; सामनातून टीका

डोनाल्ड ट्रम्पही भाजपात प्रवेश करतील, त्यांचे 'सूटबूट' भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ होतील; सामनातून टीका

ठाकरे गटाचा सामना अग्रलेखातून भाजपावर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

ठाकरे गटाचा सामना अग्रलेखातून भाजपावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पॉर्न स्टारला अवैधरित्या पैसे दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

याच पार्श्वभूमीवर सामनातून भाजपावर टीका करण्यात आली आहे. सामनातून म्हटले आहे की, कारवाया आणि अटका टाळण्यासाठी भ्रष्टाचारी मंडळी भाजपात प्रवेश करतात याचे मोदींना कौतुक वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे.शिवसेना सोडताच सीबीआय, ईडीने त्यांना भाजप वॉशिंग मशीनमध्ये टाकून एकदम पांढरेशुभ्र करून घेतले. जोपर्यंत भाजपकडे भ्रष्टाचार धुऊन काढण्याची वॉशिंग मशीन आहे तोपर्यंत पंतप्रधानांनी भ्रष्टाचार मोडून काढू वगैरे भाषा न वापरलेलीच बरी. असे सामनातून म्हटले आहे.

तसेच महाराष्ट्राचे सरकार पाडण्यासाठी 2000 कोटी रुपये खर्च झाले. ते आणले कोठून? सीबीआय याचा तपास करणार आहे काय? अदानी हे अत्यंत शक्तिमान उद्योगपती आहेत. त्यामुळे सीबीआय त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत दाखवणार नाही. पुन्हा अदानी-मोदी हे बंधुतुल्य नात्याने बांधले गेले आहेत. त्यामुळे राजकीय इच्छाशक्ती वगैरे शब्द वापरून मोदींनी भ्रम निर्माण करू नये. भ्रष्टाचार हा सत्ताधाऱयांचा असो नाहीतर विरोधकांचा, दोन्ही प्रकारचा गैरव्यवहार संपवायला हवा. असे म्हणत सामनातून हल्लाबोल करण्यात आले.

पुढे सामनातून म्हटले आहे की, कोणत्याही भ्रष्टाचाऱ्याला वाचवू नका आणि पाठीशीही घालू नका, असे मोदी म्हणत असले तरी सीबीआयचा पोपट पिंजऱ्यातच मालक सांगेल त्याप्रमाणे सीबीआयचा पोपट 'विटू विटू' किंवा 'मिठू मिठू' करीत आहे. डोनाल्ड ट्रम्पही दिल्लीत येऊन भाजपात प्रवेश करतील, ट्रम्प यांचे 'सूटबूट' भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ होतील. सीबीआय, ईडीने फक्त कपडे वाळत घालून त्यास कडक इस्त्री करावी. असे सामनातून म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com