‘…हे सगळे कलंक मावळत्या वर्षातलेच; शिवसेनेचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

‘…हे सगळे कलंक मावळत्या वर्षातलेच; शिवसेनेचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

गेल्या दोन आठवड्यांपासून नागपुरात चालू असलेल्या अधिवेशनाची काल सांगता झाली.
Published by  :
Siddhi Naringrekar

गेल्या दोन आठवड्यांपासून नागपुरात चालू असलेल्या अधिवेशनाची काल सांगता झाली. मात्र यातून राजकीय वर्तुळात चांगलेच पडसाद उमटले. यातच आज 31 डिसेंबर. 2022 वर्षातील शेवटचा दिवस. कसे होते हे वर्ष? याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा अग्रलेख सामनातून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

मावळत्या वर्षाचा आज अखेरचा दिवस. 31 डिसेंबरची मध्यरात्र उलटली की, सालाबादप्रमाणे भिंतीवर टांगलेले जुने कॅलेंडर खाली उतरतील आणि नवीन कॅलेंडर त्यांची जागा घेईल. दिनदर्शिकेची केवळ पाने बदलतील, पण त्याने काय होणार? हा प्रश्न म्हणून ठीक असला तरी बदलत्या काळासोबत धावावे तर लागतेच. सरकारविरुद्ध बोलणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना सरकारी यंत्रणांचा वाटेल तसा गैरवापर करून तुरुंगात डांबले, पण उशिरा का होईना वर्षाखेरीस न्यायालयात या सरकारी मुस्कटदाबीचे थोबाड फुटले’, असे म्हणत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.

‘सरकारी यंत्रणांचा आजवर कधीही झाला नाही, असा गैरवापर करून देशात दहशत आणि भयाचे वातावरण सरत्या वर्षात निर्माण केले गेले. एका अर्थाने धोक्याचे आणि खोक्यांचे वर्ष म्हणूनच २०२२ ची नोंद इतिहासात होईल. दबावतंत्राचा वापर करून महाराष्ट्रात घडवले गेलेले बेकायदेशीर व घटनाबाहय़ सत्तांतर हे त्याचे धडधडीत उदाहरण’. हिंदुस्थानपुरता विचार करायचा तर मावळते वर्ष देशातील लोकशाहीच्या हत्याकांडाचे वर्ष ठरले. पाशवी बहुमताच्या जोरावर हुकूमशाही पद्धतीने वागणाऱ्या राज्यकर्त्यांनी जनतेला, सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांना भयभीत करण्याचे सत्रच गेले वर्षभर चालवले. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारा मीडिया एकतर सरकारने बगलबच्च्यांकरवी खरेदी केला किंवा धाकदपटशा दाखवून मुख्य प्रवाहातील साऱ्याच प्रसारमाध्यमांची तोंडे बंद केली, असे सामनातून म्हटले आहे.

तसेच सरकारी यंत्रणांचा आजवर कधीही झाला नाही, असा गैरवापर करून देशात दहशत आणि भयाचे वातावरण सरत्या वर्षात निर्माण केले गेले. एका अर्थाने धोक्याचे आणि खोक्यांचे वर्ष म्हणूनच 2022 ची नोंद इतिहासात होईल, ‘विरोधी पक्षात असलेले सारेच नेते भ्रष्ट आणि तीच मंडळी ईडी वा सीबीआयच्या धाकाने सत्ताधाऱ्यांच्या छावणीत दाखल झाली की, धुऊन-पुसून स्वच्छ, अशी भलतीच व्याख्या सरत्या वर्षात सरकारने रूढ केली. केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे नको तेवढे व्यक्तिस्तोम माजवले जात असतानाच चीनने हिंदुस्थानात केलेल्या घुसखोरीपासून महागाई, बेकारी, ढासळलेली अर्थव्यवस्था, डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली अपमानास्पद घसरण, हे सगळे कलंक मावळत्या वर्षातलेच. पुन्हा यावरून प्रश्न विचारेल त्यांना ब्लॅकमेलर्सचा वापर करून तुरुंगात डांबलेच म्हणून समजा’, असे म्हणत सामनातून टीकास्त्र सोडण्यात आले आहे.

‘…हे सगळे कलंक मावळत्या वर्षातलेच; शिवसेनेचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
2024 पूर्वी भारतातील रस्ते अमेरिकेपेक्षा चांगले असतील - नितिन गडकरी
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com