Ajit Pawar : मनपा निवडणुकीच्या आधी अजित पवारांना मोठा धक्का! बडा नेता युतीतून बाहेर

Ajit Pawar : मनपा निवडणुकीच्या आधी अजित पवारांना मोठा धक्का! बडा नेता युतीतून बाहेर

महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनपेक्षित अडचण समोर आली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनपेक्षित अडचण समोर आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील त्यांची रणनीती अचानक बदलण्याची वेळ आली आहे.

प्रचार जोरात सुरू असताना आरपीआय (खरात) गटाने निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतल्याने दादांना मोठा धक्का बसला आहे. दलित मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ही आघाडी महत्त्वाची मानली जात होती. मात्र पक्षप्रमुख सचिन खरात यांनी अचानक निवडणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय जाहीर केला.

सचिन खरात यांनी व्हिडीओ संदेशातून आपली भूमिका स्पष्ट केली. सन्मानजनक जागा न मिळाल्याने आपण महानगरपालिका निवडणुकांपासून दूर राहत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आलेल्या या घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com