सदाभाऊ खोत यांनी रसवंतीगृहावर स्वतः काढला उसाचा रस

सदाभाऊ खोत यांनी रसवंतीगृहावर स्वतः काढला उसाचा रस

माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे सांगलीमध्ये आले असता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर असणाऱ्या उसाच्या घाण्यावर स्वतः काम करत उसाचा रस काढला.

संजय देसाई, सांगली: माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे सांगलीमध्ये आले असता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर असणाऱ्या उसाच्या घाण्यावर स्वतः काम करत उसाचा रस काढला. ऊस दराचे आंदोलनच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. ज्या प्रमाणे उसापासून साखर तयार होते, त्याच प्रमाणे उसापासून तयार होणाऱ्या अनेक प्रकल्पांना यापुढे चालना दिली पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

सदाभाऊ खोत यांची राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया

राज्यात टिकेची पातळी घसरली आहे. विरोधकडून चिखलफेक आणि व्यक्ती दोषाचं राजकारण सुरू आहे, त्यामुळे मी गप्प राहिलो होतो अस सांगून माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, दोन साखर कारखान्या मधील अंतराची अट काढावी आणि साखर कारखान्यांना एफ आर पी द्यावीच लागेल अशी प्रतिक्रिया माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.

सदाभाऊ खोत यांनी रसवंतीगृहावर स्वतः काढला उसाचा रस
राणा आणि कडूंचा वाद नाटकी, चंद्रकांत खैरेंचा घणाघात
Lokshahi Marathi
www.lokshahi.com