बातम्या
मिटकरींकडे पोत्याने नोटा; त्यामुळेच त्यांच्या पोटात गोळा - सदाभाऊ खोत
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढल्या आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढल्या आहेत. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2 हजारांच्या नोटा बँकेतून बदलून घेता येणार आहेत. या निर्णयावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.
यातच आता सदाभाऊ खोत यांनी अमोल मिटकरी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सदाभाऊ खोत म्हणाले की, नोटबंदीची भीती सर्वसामान्य शेतकऱ्यांना नसून दोन नंबर, काळ्या पैसेवाल्यांनाच जास्त आहे. मी दोन हजारांबरोबरच ५०० आणि १०० रुपयांची नोटही मागे घ्या, असे म्हटले आहे.
अमोल मिटकरी तुम्ही ज्या पक्षात आहात तो पक्ष सरदारांचा आहे. या सरदारांनी गावगाढ्यातील शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना लुटलेले आहे. अमोल मिटकरी तुमच्याकडे पोत्याने नोटा आहेत. त्यामुळेच तुमच्या पोटात गोळा आला आहे. अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.