मुंबई : बहुप्रतिक्षित भव्य माती वाचवा सार्वजनिक कार्यक्रम काल उत्साहात पार पडला. यावेळी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य उद्धव ठाकरे उपस्थित होते. सद्गुरूंनी 25,000 किलोमीटरहून अधिक मोटार सायकल प्रवासानंतर, काल मुंबई मध्ये भव्य सार्वजनिक कार्यक्रम घेतला. लोकांचा मोठा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला. संपूर्ण माती वाचवा धोरण हँडबुकमधील महत्त्वाच्या गोष्टींबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देताना सद्गुरू म्हणाले की, शेती एक व्यावहारिक कृती असून, या कृतीला एक व्यावसायिक आधार आहे. शेती आपल्या जगण्याचा आधारही आहे. शेतीला व्यावहारिक संबोधित करण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले. तसंच या कार्यक्रमानंतर त्यांनी मुंबईतील डबेवाल्यांची भेट दिली.