ताज्या बातम्या
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण; आरोपीच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याची माहिती
सैफ अली खानवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली शरीफुलला 16 जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती.
सैफ अली खानवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली शरीफुलला 16 जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. यातच आता सैफ अली खानच्या घरातून एकूण 19 बोटांचे नमुने घेण्यात आले होत आणि त्यापैकी एकही नमुना शरीफुलशी जुळत नसल्याची आता माहिती मिळत आहे.
यातच अशीही चर्चा आता रंगली आहे की, सैफ अली खानच्या इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेला व्यक्ती आणि अटक करण्यात आलेली व्यक्ती दोन्ही वेगवेगळ्या दिसत असल्याचा चर्चा सुरु आहेत.
याच्याआधी पोलिसांनी सैफच्या घरी सापडलेल्या व्यक्तीचे बोटांचे ठसे शरिफुलच्या बोटांच्या ठश्यांशी जुळल्याचा दावा केला होता मात्र आता एकही नमुना शरीफुलशी जुळत नसल्याची आता माहिती मिळत आहे. त्यामुळे आता सैफ अली खान प्रकरणावरुन अनेक प्रश्न उपस्थित केलं जात आहेत.