Saif Ali Khan यांच्या पाठीत खुपसलेला चाकूचा तुकडा डॉक्टरांनी काढला बाहेर, मात्र...
अभिनेता सैफ अली खान यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर बॉलीवुड हादरलं आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील बांद्रा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावरही हल्ला झाला होता. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तसेच अभिनेता शाहरूख खानच्या घरीही अज्ञाताने घुसण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर कायदा सुवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर सैफ अली खान यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. लिलावती रूग्णालयातील डॉक्टरांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची अपडेट दिली आहे.
अभिनेता सैफ अली खान यांच्या बांद्रा येथील घरी गुरूवारी (१६ जानेवारी) रोजी मध्यरात्री हल्लेखोर घुसला. हल्लेखोराबरोबर झालेल्या झटापटीत सैफ अली खान जखमी झाले. सैफवर हल्लेखोराने धारदार चाकूने वार केले. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला. त्याला मध्यरात्री लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हल्लेखोराने धारदार चाकूने केलेले वार खोलवर होते. त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.
सैफ यांच्या पाठीत घुसवलेला चाकूचा तुकडा समोर
चोरट्याने सैफ यांच्या पाठीत घुसवलेला चाकूचा तुकडा समोर आला आहे. जवळपास अडीच ते तीन इंचाचा हा तुकडा सैफ यांच्या पाठीतून शस्त्रक्रिया करुन काढला आहे. सैफ अली खान यांची प्रकृती उत्तम असून त्याला आज स्पेशल रुममध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. जखम मोठी असल्यानं सैफला आठवडाभरासाठी आरामाचा सल्ला दिला आहे. लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
सैफ यांच्या डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
सैफ अली खान यांची तब्येत एकदम चांगली आहे. त्यांना आज बेडवरून उठवून चालण्यास सांगितले. त्यांना चालताना काही त्रास नाही. फक्त पाठीमध्ये खोल जखम असल्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे त्यांना बेड रेस्ट सांगितली आहे. म्हणून त्यांना आता आयसीयूमधून स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट करत आहोत. ते आऊट ऑफ डेंजर आहेत आणि स्टेबल ही आहेत. त्यांना आता कशाची रिस्क नाही. पॅरिलॅसिस किंवा कशाचाही धोका नाही. ते आता चालू शकतात.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-