Saif Ali Khan : सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

Saif Ali Khan : सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

अभिनेता सैफ अली खानवर चाकून हल्ला करण्यात आल्याची घटना घडली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • सैफ अली खानला आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

  • चाकूहल्ल्यानंतर गेल्या 4 दिवसांपासून सैफवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

  • अद्याप पोलिसांनी सैफचा जबाब नोंदवला नाही.

अभिनेता सैफ अली खानवर चाकून हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आला. सैफ अली खान यामध्ये जखमी झाला आणि सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. शस्त्रक्रियेनंतर सैफच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती आहे. गेल्या 4 दिवसांपासून सैफवर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज सैफ अली खानला घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

या प्रकरणात अद्याप पोलिसांनी सैफ अली खानचा जबाब नोंदवला नसून आज नोंदवण्यात येणार असल्याची माहिती मिळत असून सैफ अली खान याचा जबाब घरी नोंदवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com