ताज्या बातम्या
संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प. शिरीष महाराजांनी उचलले टोकाचे पाऊल
राहत्या घरी गळफास लाऊन घेत संपवलं आयुष्य
देहू येथून एक दुःखद वृत्त समोर आले आहे. संत तुकाराम यांचे अकरावे वशंज हभप शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे. मात्र त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. त्यांच्या निधनाने कुटुंबीय तसेच संपूर्ण देहू गावावर शोककळा पसरली आहे. याबद्दल पोलिसांनी माहिती दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरीष महाराज यांनी सकाळी आठ वाजल्याच्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले आहे. आर्थिक अस्थिरता असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक अंदाजातून समोर आले आहे.
शिरीष महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिस आता अधिक तपास करत आहेत . शिरीष महाराज यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशानभूमिमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहितीदेखील समोर आली आहे.