नोकरदारांसाठी गोड बातमी, यंदा पगारात होणार चांगली वाढ

नोकरदारांसाठी गोड बातमी, यंदा पगारात होणार चांगली वाढ

जागतिक मंदीच्या तोंडावर भारतातील कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 2022 पेक्षा जास्त वाढ करण्याच्या तयारीत आहे.

जागतिक मंदीच्या तोंडावर भारतातील कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 2022 पेक्षा जास्त वाढ करण्याच्या तयारीत आहे. कॉर्न फेरी या संस्थेने केलेल्य अभ्यासात ही माहिती समोर आहे. 2022 साली कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी 9.2 टक्के वाढ झाली होती. परंतु 2023 मध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारत 9.8 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

2023 च्या सुरुवातीला आयटी क्षेत्रातल्या अनेकांचा रोजगार गेला आहे. गेल्या वर्षाच्या शेवटीच जगात जागतिक मंदीचा अंदाज वर्तवला जात होता आणि अगदी तशीच सुरुवात झाली आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांची आकडेवारी पाहिली तर तब्बल 24 हजार 151 आयटी कर्मचाऱ्यांचा रोजगार गेला आहे.

"जगात महामंदी येणार अशी चर्चा सुरु झाली. अनेक कंपन्यांमध्ये नोकरकपातीचा ट्रेण्ड सुरु आहे. भारताचा जीडीपी 6 टक्क्यांच्यावर असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे कुशल कर्मचाऱ्यांच्या पगारात 15 ते 30 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. असे Korn Ferry चे नवनीत सिंह यांनी सांगितले. ज्या कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे त्या कर्मचााऱ्यांच्या पगारात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com