Salman Khan: जीवे मारण्याच्या धमक्यांवर सलमान खान व्यक्त, म्हणाला, "तसेच माझ्यासोबत घडणार..."
बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या 'सिंकदर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. तो सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रोमोशन दरम्यान एका मुलाखतीमध्ये सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीबद्दलचे प्रश्न विचारले असता, सलमान खानने आपले मौन सोडले असून त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
धमकीबद्दलचे प्रश्न विचारले असता, सलमान म्हणाला की, "मी या धमक्यांना घाबरत नाही. मी हे सर्व देवावर सोडले आहे. देवाने माझे जेवढे वय लिहिले आहे आणि माझ्या नशीबात जे लिहिले तसेच माझ्यासोबत घडणार आहे".
बिष्णोई सलमान खानचा काय संबध
सलमान खान आणि कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई गँगमध्ये 1998 साली वैर सुरु झाले. राजस्थानमध्ये 'हम साथ साथ है' या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. या दरम्यान सलमान खानने दोन काळविटांची शिकार केली. सलमान खानने वन्य प्राण्यांची शिकार केल्याने तो कायद्याच्या कचाट्यात सापडला. 2018 रोजी सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा सुनवण्यात आली होती. परंतु दोन दिवसात 50 हजार रुपयांच्या जामीनावर सलमान खान बाहेर आला. यासर्व प्रकरणामुळे लॉरेन्स बिष्णोई गँगचा सलमान खानवर राग आहे.