Salman Khan : सलमानच्या हातावर भगवं घड्याळ, राममंदिराचं चित्र; मौलानांचा संताप म्हणाले...
अभिनेता सलमान वेगवेगळ्या कारणाने नेहमी चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या सिंकदर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेता सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट रमजान ईदच्या दिवशी प्रदर्शित होतो आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात सलमान खानने हजेरी लावली होती.
यावेळी सलमान खानच्या हातातील घडाळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सलमानच्या हातावर भगवं घड्याळ असून या घड्याळाच्या डायलवर राम मंदिर आहे.
हे घड्याळ जेकब अँड कंपनी एपिक एक्स रामजन्मभूमी टायटॅनियम एडिशन 2 आहे. हे लिमिटेड एडिशन वॉच असून त्याची किंमत ३४ लाख रुपये आहे. त्यामुळे आता या सलमानच्या नव्या घड्याळाची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.
मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी काय म्हटले?
सलमान खान देशातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. सलमान खान प्रसिद्ध मुस्लिम अभिनेता आहे. त्याचे अनेक चाहते देशभरात आहेत. लाखो फॉलोअर्स आहेत. सलमानने राम मंदिराच्या प्रचारासाठी राम जन्मभूमीचं चित्र असलेलं घड्याळ हातात घातलं आहे. मी सांगू इच्छितो की, कुठलाही मुस्लिम माणूस मग तो सलमान खान असला तरी तो राम मंदिरांचा प्रचार करत असेल किंवा गैर इस्लामी संस्थांचा प्रचार करत असेल तर ती कृती हराम आहे. अशा माणसाने माफी मागितली पाहिजे. सलमान खानला मी सांगू इच्छितो, शरियतचा त्याने सन्मान करावा. सलमान खानची दिनचर्या जी आहे ती शरियत प्रमाणे झाली पाहिजे. सलमानने नियमांचं पालन केलं तर कयामतच्या दिनी त्यांना उत्तर द्यावं लागणार नाही. राम एडिशनचं घड्याळ हातात घालणं हे योग्य नाही. असं मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी म्हटलं आहे.