Bigg Boss 19 : ‘बिग बॉस 19’ची जोरदार सुरुवात; पाहा घरातील 16 स्पर्धकांची यादी!
छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत राहणारा आणि वादग्रस्त मानला जाणारा शो बिग बॉस यंदा 19व्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉलिवूड स्टार सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये कोणते कलाकार दिसणार याची उत्सुकता अखेर संपली आहे.
पहिली एन्ट्री झाली अभिनेत्री अशनूर कौरची, तर गँग्स ऑफ वासेपूर 2 मधील लोकप्रिय अभिनेता झिशान कादरी देखील या घरात दाखल झाला आहे. मॉडेल तान्या मित्तल, डान्सर कपल नगमा मिराजकर आवेज दरबार, तसेच मिस दिवा युनिव्हर्स 2018 विजेत्या नेहल चुडासमानेही सहभाग घेतला आहे.
याशिवाय अभिनेता गौरव खन्ना, अभिनेते अभिषेक बजाज व बशीर अली, आंतरराष्ट्रीय कलाकार नटालिया जानोसजेक, मराठमोळा स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मोरे, अभिनेत्री फरहाना भट्ट, भोजपुरी स्टार नीलम गिरी, अभिनेत्री कुनिका सदानंद आणि प्रेक्षकांच्या मतांमुळे घराचा भाग झालेला मृदुल तिवारी अशी दमदार फळी शोमध्ये दिसणार आहे.
सर्वात मोठा सरप्राइज म्हणजे गायक व संगीतकार अमाल मलिक याचा सहभाग. त्याने गाण्यानेच घरात प्रवेश करून प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धकांच्या उपस्थितीमुळे बिग बॉस 19चा सीझन अधिक रंगतदार होणार यात शंका नाही.