Salman Khan : सलमान खानच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; पोलिसांनी गॅलक्सीत घुसणाऱ्या दोन अज्ञातांना घेतलं ताब्यात

Salman Khan : सलमान खानच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; पोलिसांनी गॅलक्सीत घुसणाऱ्या दोन अज्ञातांना घेतलं ताब्यात

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या जीवाला पुन्हा धोका निर्माण होत असल्याच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत.
Published by :
Rashmi Mane
Published on

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या जीवाला पुन्हा धोका निर्माण होत असल्याच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. या आठवड्यात सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पुरूष आणि एका महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची माहिती पोलिसांनी आज, गुरुवारी दिली. त्यामुळे बिश्नोई गँगची धमकी, जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आणि आता घरामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न यामुळे सलमान खानच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने मंगळवार आणि बुधवारी वांद्रे (पश्चिम) येथील सलमान खानचे घर असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये प्रवेश करण्याचा वेगवेगळा प्रयत्न केला. जितेंद्र कुमार सिंग (वय २३) आणि महिलेचे नाव ईशा छाबरा (वय ३२) असे या आरोपींची ओळख पटली आहे.

नेमकं काय घडलं

सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये मंगळवार, २० मे रोजी संध्याकाळी एक अज्ञात व्यक्ती घुसल्याची बातमी आहे. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. ही घटना २० मे रोजी संध्याकाळी ७.१५ वाजता घडली. या व्यक्तीने सलमान खानच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले.

परिणामी, सलमान खानच्या सुरक्षेत अधिकच वाढ करण्यात आली असून पोलिसांकडून त्या दोघांची कसून चौकशी सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com