Abu Azmi : मराठीच्या मुद्द्यांवरुन अबू आजमी संतापले म्हणाले की, "मराठीचा सन्मान आवश्यक, पण..."
Abu Azmi : मराठीच्या मुद्द्यांवरुन अबू आजमी संतापले म्हणाले की, "मराठीचा सन्मान आवश्यक, पण..."Abu Azmi : मराठीच्या मुद्द्यांवरुन अबू आजमी संतापले म्हणाले की, "मराठीचा सन्मान आवश्यक, पण..."

Abu Azmi : मराठीच्या मुद्द्यांवरुन अबू आझमी संतापले म्हणाले की, "मराठीचा सन्मान आवश्यक, पण..."

अबू आझमी मराठी भाषा: सन्मान आवश्यक, पण भाषावाद टाळा.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Abu Azmi Press Conference On Marathi Language Controversy : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आसिम आजमी यांनी भिवंडीत पत्रकारांशी संवाद साधला आहे. त्यावेळेस ते म्हणाले की, मराठी भाषा, परप्रांतीयांवरील हल्ले आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, “मराठी ही भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि अस्मितेचे प्रतीक आहे. तिचा योग्य सन्मान झाला पाहिजे.” मात्र त्याचवेळी त्यांनी मराठी येत नसल्यामुळे कोणावरही हल्ला होणे चुकीचे असल्याचे ठामपणे नमूद केले.

“महाराष्ट्रात सगळ्यांना संधी मिळते”

आजमी म्हणाले की, “महाराष्ट्र हे असे राज्य आहे जिथे देशाच्या विविध भागांतून लोक येऊन मेहनतीच्या जोरावर आपले भविष्य घडवतात. इथे उपाशीपोटी आलेली व्यक्ती ही मेहनतीमुळे प्रगती करते. ही महाराष्ट्राच्या मोठेपणाची ओळख आहे. कोणी परप्रांतीय असला म्हणून त्याला फक्त भाषेच्या आधारावर मारहाण करणे ही निंदनीय बाब आहे. अशा घटनांवर राज्य सरकारने कठोर पावले उचलायला हवीत.”

"मराठीचा आदर सर्वांनी करावा, पण भाषावाद टाळा"

आजमी म्हणाले की, “आम्ही महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा आदर करतो. मात्र काही लोक मराठी अस्मिता आणि हिंदी भाषिकांमध्ये तेढ निर्माण करून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हे योग्य नाही. मराठी माणसाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.”

हेही वाचा..

Abu Azmi : मराठीच्या मुद्द्यांवरुन अबू आजमी संतापले म्हणाले की, "मराठीचा सन्मान आवश्यक, पण..."
Bharat Gogawale : अधिवेशनात भरत गोगावलेंचं स्वागतच "ओम भट् स्वाहा"ने ; आधी राग आणि नंतर एकच हशा, नेमकं काय घडलं ?
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com