राज्यात मोठी उलतापालथ भाजपामध्ये?; बाहुबली देवेंद्र फडणवीस हे राज्यातील या सगळ्या उपक्रमातून बेपत्ता; सामनातून हल्लाबोल
Admin

राज्यात मोठी उलतापालथ भाजपामध्ये?; बाहुबली देवेंद्र फडणवीस हे राज्यातील या सगळ्या उपक्रमातून बेपत्ता; सामनातून हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांना खुद्द अजित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. याच पार्श्वभूमीवर सामनाचा अग्रलेख सामनातून हल्लाबोल करण्यात आली आहे.

सामनातून म्हटले आहे की, अजित पवार यांच्याबाबतही अशाच वावड्या उडवल्या. ते भाजपसोबत जाणार आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाणार आहे, अशा वावड्या उडवण्यात आल्या.पण अजितदादांनी या चर्चांना तिलांजली दिली आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. शिंदे गट म्हणजे बिनकामाचे ओझे झाले आहे. त्यांना दूर करण्यासाठीच भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. असे सामनातून म्हटले आहे.

महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या नेत्यांना दिल्लीत बोलावण्यात आले. ते दोन नेते कोण तर बावनकुळे आणि आशिष शेलार. म्हणजे अजित पवारांसारख्या बलदंड नेता 40 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करतोय. कधी शिवसेना तर कधी राष्ट्रवादी फोडून स्वत:चे घर भरायचे काम सुरू आहे. भाजपची काँग्रेसवरही वाईट नजर आहे. असे म्हणत सामनातून टीका करण्यात आली आहे.

यासोबतच आश्चर्य म्हणजे कालचे बाहुबली देवेंद्र फडणवीस हे राज्यातील या सगळ्या उपक्रमातून बेपत्ता आहेत. त्यामुळे राज्यात सर्वात मोठी उलतापालथ ही भाजपमध्ये सुरू आहे की काय? अशी शंका घ्यायला जागा आहे. असे सामनातून म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com