राज्यात मिंधे सरकार आल्यापासून राज्याला पनवतीच लागली, शिवशंभोचा शंख फुंकावाच लागेल; सामनातून टीका
Admin

राज्यात मिंधे सरकार आल्यापासून राज्याला पनवतीच लागली, शिवशंभोचा शंख फुंकावाच लागेल; सामनातून टीका

आसाम सरकारने महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर दावा केला आहे.

आसाम सरकारने महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर दावा केला आहे. त्यांनी यावर जाहीरात देखिल दिली आहे. यावर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा अग्रलेख सामनातून टीका करण्यात आली आहे. सामनातून म्हटले आहे की, सहावे ज्योतिर्लिंग आसाममध्येच असल्याचा दावा केला जात आहे. पण ही उचकी तुम्हाला आताच कशी लागली? या आधी तुम्हाला असा साक्षत्कार का झाला नाही? अनेक महाशिवरात्री आल्या आणि गेल्या आताच तुम्हाला नसता उपद्व्याप का आठवला? राज्यातील भाजप सरकार आसामच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेले आहे. म्हणूनच त्यांच्याकडून हा दावा केला जात. असे सामनातून म्हटले आहे.

देशाची आर्थिक राजधानी हा मुंबईचा मुकूट हिरावण्याचाही प्रयत्न सुरू आहे. केंद्र आणि भाजपशासित राज्यांकडून महाराष्ट्राबाबत उफराटा कारभार केला जात आहे. लाचार मिंधे सरकारमुळे तो महाराष्ट्राच्या मुळावर उठला आहेच, पण महाराष्ट्र धर्माच्या अस्तित्वालाही धडका देऊ लागला आहे. अशी सामनातून टीका करण्यात आली आहे.

यासोबतच महाराष्ट्रात मिंधे सरकार आल्यापासून राज्याला पनवती लागली आहे. केंद्रापासून इतर भाजपशासित राज्यांपर्यंत सगळेच महाराष्ट्राची लूट करत आहेत. त्यात आता आसामची भर पडली आहे. सहावे ज्योतिर्लिंग महाराष्ट्राचे नसून आमचेच आहे, असा दावा आसाम सरकारने केला आहे.देव, धर्म आणि राष्ट्राचं रक्षण करणाऱ्या महाराष्ट्राला हतबल करण्याचं हे षडयंत्र आहे. त्यामुळे या सरकार विरोधात आता राज्यातील जनतेलाच शिवशंभोचा शंख फुंकावाच लागेल. असा हल्लाबोल सामनातून करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com