“मी काडतूस आहे, हम घुसेंगे” साहेब, किधर घुसेंगे? एकदा काय ते स्पष्ट करा; सामनातून हल्लाबोल
Admin

“मी काडतूस आहे, हम घुसेंगे” साहेब, किधर घुसेंगे? एकदा काय ते स्पष्ट करा; सामनातून हल्लाबोल

ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्तीला शिंदे गटाच्या काही महिलांनी मारहाण केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्तीला शिंदे गटाच्या काही महिलांनी मारहाण केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्याच प्रकरणावरून उध्दव शिवसेना ठाकरे गटप्रमुख उध्दव ठाकरेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती.

एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. केवळ उपमुख्यमंत्रीपद मिरवलं आणि चमकायचं हेच ते करत आहेत. फडतूस गृहमंत्र्याला पदावर बसण्याचा अधिकार नाही. स्वतःच्या घरात काही झालं की एसआयटी नेमायची. हे गुंड मुख्यमंत्री आहेत का? गुंड मंत्री असं एक खातं आता त्यांनी या सरकारमध्ये सुरु केलं पाहिजे. ताबडतोब गृहमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी टीका उध्दव ठाकरेंनी केली होती.

त्यावर प्रतिउत्तर देत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी फडतूस नाही काडतूस आहे. हम घुसेंगे. मी गृहमंत्री आहे, याचीच अनेकांना अडचण आहे. पण मी गृहमंत्रीपद सोडणार नाही. बेकायदेशीर काम करणाऱ्यांना तुरुंगात टाकणारच असे ते म्हणाले.

याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाच्या सामना अग्रलेखातून भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. सामनातून म्हटले आहे की, तुम्ही तुमच्या पायावर तरी उभे राहू शकाल काय? तुमच्या काडतुसाची दारू ही त्या केंद्रीय यंत्रणांची आहे. नाहीतर तुम्ही सगळे एकजात पाद्रे पावटेच आहात. डॉ. मिंधे गँगचे लोक ठाण्यासारख्या सुसंस्कृत शहरात राजकीय अंडरवर्ल्ड चालवत आहेत. ही गुंडगिरी रोखण्याची हिंमत तुमच्या गृहखात्यात नसेल तर मर्दानगीची ‘काव काव’ बंद करा” असे सामनातून म्हटले आहेत.

तसेच राज्याचे काडतूस गृहमंत्री फडतूस भाषेत आरोळी ठोकतात, मी काडतूस आहे, हम घुसेंगे. साहेब, किधर घुसेंगे? एकदा काय ते स्पष्ट करा“या मर्द देशावर तुमच्या राज्यकारभारामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून ‘नामर्दानगी’चा शिक्का बसला व राज्याची बेअब्रू झाली. महाराष्ट्राचे सरकार ‘नपुंसक’ आहे म्हणजेच बिनकामाचे आहे, असे जर सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे, तर मग भाजपच्या चवन्न्या आणि ‘बावन’ आण्यांना इतका थयथयाट करण्याचे कारण काय? असे म्हणत सामनातून हल्लाबोल केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com