‘पापुआ’ नामक ‘पप्पू’ देशात जाऊन तेथील पंतप्रधानांकडून चरणस्पर्श करून घ्यायचा हे ढोंग; सामनातून हल्लाबोल

‘पापुआ’ नामक ‘पप्पू’ देशात जाऊन तेथील पंतप्रधानांकडून चरणस्पर्श करून घ्यायचा हे ढोंग; सामनातून हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी पापुआ न्यू गिनी या देशात गेले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी पापुआ न्यू गिनी या देशात गेले आहेत. यावेळी पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे स्वतः मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर होते. मोदींचं स्वागत करताना जेम्स मारापे यांनी मोदींच्या पायाला स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले. यावरुनच आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून टीका करण्यात आली आहे. सामनातून म्हटले आहे की, महाराष्ट्रातही लोकशाही व संविधानाच्या मुसक्या बांधून एक ‘पापुआ न्यू गिनी’ छाप सरकार सत्तेवर बसवले व तेसुद्धा दिल्लीश्वरांचे सदैव चरणस्पर्श करीत असते. मोदी विश्वगुरू आहेत. ‘पापुआ’ देशाचे पंतप्रधान त्यांच्या पाया पडतात, पण मोदींच्या देशात लोकशाहीच्या मुसक्या आवळल्या आहेत, त्याचे काय? असा सवाल सामनातून विचारला आहे.

तसेच चीनच्या मुसक्या आवळाल तेव्हा आवळाल, पण देशात लोकशाही, संविधानाच्या मुसक्या मोदी राज्यात आवळल्या जात आहेत. लोकशाहीच्या मुसक्या बांधून, त्याचे गाठोडे करून संसदेच्या कोपऱ्यात अडगळीत ठेवून दिले. ‘पापुआ’ नामक ‘पप्पू’ देशात जाऊन तेथील पंतप्रधानांकडून चरणस्पर्श करून घ्यायचा हे ढोंग आहे. देशाच्या राजधानीतच लोकशाहीच्या मुसक्या बांधल्या आहेत. त्या आधी मोकळ्या करा व मग चीनच्या मुसक्या बांधण्याची भाषा करा. असे सामनातून म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com