Shivsena Vardhapan Din: वर्धापनदिनीच ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी उलथापालथ! सामंतांच्या 'त्या' वक्तव्यामुळे वाढली चिंता

Shivsena Vardhapan Din: वर्धापनदिनीच ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी उलथापालथ! सामंतांच्या 'त्या' वक्तव्यामुळे वाढली चिंता

वर्धापनदिन उलथापालथ: सामंतांच्या वक्तव्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत चिंतेचं वातावरण, मोठा धक्का बसण्याची शक्यता.
Published by :
Prachi Nate
Published on

आज शिवसेनेचा 59 वा वर्धापनदिन आहे. 58 वर्षं झालेल्या बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात शिवसेनेतील पक्ष फुटीनंतरची वर्धापनदिनाची ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांकडून ही मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापनदिन यंदाच्या वर्षीही षण्मुखानंद सभागृहात साजरा केला जाणार आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंकडून मुंबईच्या वरळी डोम येथे शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे.

याचपार्श्वभूमीवर आता उदय सामंतांच एक मोठ वक्तव्य समोर येत आहे. उदय सामंत यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त बोलताना एक मोठ वक्तव्य केलं होत की, 19 तारखेला धमाका होईल. यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतून कोणता मोठा पदाधिकारी पक्षप्रवेश करणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काल उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील माजी नगरसेवकांची बैठकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेतील 3 माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे.

त्यामुळे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही कालावधीत ठाकरेंच्या शिवसेनेतून अनेक नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे आज शिवसेनेच्या वर्धापनदिनी ठाकरे गटाची चिंता वाढणार का

उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, वर्धापन दिनाच्या दिवशीच हे नगरसेवक शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. लगेचच अनेक नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे उद्या देखील शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

उदय सामंत म्हणाले होते की, "रोजच धमाका होतो आहे, एकनाथ शिंदे हे रोजच कोणत्या न कोणत्या पक्षप्रवेशासाठी जातात. उबाठाचे अनेक पदाधिकारी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहेत. रोज एवढा धमका होतो आहे, तर मला वाटतं की, 19 तारखेला काही तरी मोठा दमाका होईल. "

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com