Samarjeet Ghatage : दिल्लीचं माझ्यावर जास्त प्रेम आहे

Samarjeet Ghatage : दिल्लीचं माझ्यावर जास्त प्रेम आहे

लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यात कोल्हापूरात शाहू महाराज छत्रपतींविरोधात समरजित घाटगे यांना मैदानात उतरवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर लोकसभा उमेदवारीबाबत समरजित घाटगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समरजित घाटगे म्हणाले की, आपल्यावर वैयक्तिक प्रेम असल्यामुळे पदाधिकारी काही घोषणा करतात मात्र पक्षशिष्टाचार हा महत्त्वाचा आहे.

तसेच ते म्हणाले की, कोल्हापूरच्या उमेदवारीबाबत निर्णय दिल्लीत होणार. दिल्लीचं माझ्यावर जास्त प्रेम आहे. उमेदवारी बाबत सर्व निर्णय हा दिल्लीत होणार असल्याचे समरजित घाटगे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com