Admin
संभाजी ब्रिगेडची ठाकरे गटासोबत युती आहे. ठाकरे गटाचे मित्र पक्ष असलेल्या संभाजी ब्रिगेडने ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वीच संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेसोबत युती केली होती. संभाजी ब्रिगेडपाठोपाठ वंचित बहुजन आघाडीही कसब्यासाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संभाजी ब्रिगेडही कसबा विधानसभा पोटनिवडणूक लढवणार आहे. संभाजी ब्रिगेडचे अविनाश मोहिते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची कोंडी होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या पोटनिवडणुकीत रंगत वाढणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक संभाजी ब्रिगेडने लढविण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजी ब्रिगेडच्या शहर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक मंगळवारी पार पडली.