Harshada Shirsat and Siddhant Shirsat Win : छत्रपती संभाजीनगरात शिंदेंना मोठा धक्का! संजय शिरसाटांच्या दोन्ही मुलांनी मारली बाजी
राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. 15 जानेवारीला मतदान झाले होते आणि आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडी स्वतःच्या ताकदीवर लढताना दिसली. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, या प्रभागात भाजप आघाडीवर आहे, तरीही मंत्री संजय शिरसाट यांचे दोन्ही मुलं विजय मिळवून आला आहेत.
शिरसाट कुटुंबातील हर्षदा शिरसाट (प्रभाग क्रमांक 18 ड) आणि सिद्धांत शिरसाट यांना विजय मिळाल्याचे समोर आले आहे. हर्षदाच्या विजयावर प्रभागात जोरदार आनंद साजरा केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगरची सध्याची आकडेवारी अशी आहे – भाजप 32 जागांवर आघाडीवर, शिंदे गटाची शिवसेना 24 जागांवर, उद्धव ठाकरेंची शिवसेना 10 जागांवर, एमआयएम 17 जागांवर, काँग्रेस 2 जागांवर, राष्ट्रवादी 2 जागांवर आणि वंचित बहुजन आघाडी 4 जागांवर आहे.
मुंबई महापालिकेतही राजकीय स्पर्धा जोमात आहे. 227 जागांपैकी सध्या 127 जागांवर भाजप-शिंदे गट आघाडीवर आहे, ज्यात भाजप 96 जागांवर पुढे आहे. त्यामुळे मुंबईतही सत्ता समीकरण रोमहर्षक असल्याचे दिसते.

