ऐतिहासिक चित्रपटांसाठी स्वतंत्र इतिहासकार समिती नेमा, संभाजीराजे छत्रपती

ऐतिहासिक चित्रपटांसाठी स्वतंत्र इतिहासकार समिती नेमा, संभाजीराजे छत्रपती

हर हर महादेव या चित्रपटावरून वाद चांगलाच तापला आहे. राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

हर हर महादेव या चित्रपटावरून वाद चांगलाच तापला आहे. राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे. ऐतिहासिक चित्रपटांसाठी स्वतंत्र इतिहासकार समिती नेमा, तसेच ऐतिहासिक चित्रपटांचे पहिलं स्क्रिनिंग हे महाराष्ट्रात झालं पाहिजे, मग दिल्लीतील दिल्लीतील सेन्सॉर बोर्डकडे पाठवा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

तसेच ते म्हणाले की, नव्या पिढीचं वाचन कमी झालं आहे. मी अजून चित्रपट पाहिलेला नाही, पण इतिहासकारांनी हा चित्रपट पाहूच नका असे सांगितले आहे इतक्या चुकीच्या पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. ऐतिहासिक चित्रपटासाठी इतिहासकारांची नेमणूक आवश्यक आहे. चित्रपटात पाटील हा बलात्कारी दाखवला हे कुठं लिहिलं आहे? स्यियांना सन्मान हे शिवरायांची परंपरा यांनी चित्रपटात स्त्रियांचा बाजार मांडला आहे. शिवरायांचा काळात स्त्रियांचा बाजार भरला होता का? हे इतिहासकारांनी सांगावं. बाजीप्रभूंचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवला आहे. लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड सुरु आहे.

हर हर महादेव हा चित्रपट मी स्वत: पाहिला नाही, म चित्रपट तुम्ही बघू नका इतकी इतिहासाची मोडतोड त्यात केली आहे असं मला सांगितलं. हर हर महादेव चित्रपटात स्त्रियांविषयी आक्षेपार्ह पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. इतिहास संशोधकांनी बोलावे. जर माझी भूमिका चुकीची असेल, तुम्ही सांगावे, मी पुन्हा कधीही अशा चित्रपटांवर पत्रकार परिषद कधीही घेणार नाही. बाजीप्रभू आणि शिवाजी महाराजांची लढाई दाखवणं मान्य आहे का? चुकीचा इतिहास दाखवण्यापेक्षा चित्रपट काढूच नका, खरा इतिहास दाखवा, विरोध थांबवतो, असे संभाजीराजे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com