थेट पक्षावर दावा होत असेल, तर छोट्या पक्षांचं कसं होणार? - संभाजीराजे छत्रपती

थेट पक्षावर दावा होत असेल, तर छोट्या पक्षांचं कसं होणार? - संभाजीराजे छत्रपती

निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांना विजय झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांना विजय झाला आहे. धनुष्यबाण निशाणी व शिवसेना हे नाव बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला मिळाले आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? यावर शिंदे-ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. 17 जानेवारी रोजी निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाकडून युक्तिवाद झाल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे गटाचे दावे फेटाळून लावले होते. यावेळी 23 जानेवारीला दोन्ही गटांना लेखी स्वरुपात उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिला होते. यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला धक्का देत धनुष्यबाण व शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिले आहे.

याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, “लोकशाही असलेल्या भारताच्या घटनेत एक प्रक्रिया लिखित आहे. त्याप्रमाणेच सगळं चालतं. निवडणूक आयोग स्वतंत्र आयोग आहे. त्यामुळे त्यावर आमच्यासारख्या लोकांनी भाष्य करणं उचित नाही. त्याला एक व्यवस्था आणि प्रक्रिया आहे. त्यानुसार आयोग निर्णय घेत असतो.

तसेच माझी सरकारला विनंती असणार आहे की, त्यांनी लोकांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावे. मी अनेक प्रश्न घेऊन सरकारकडे जातो. ते प्रश्नही अद्याप सुटलेले नाहीत. पक्षाचं नाव आणि चिन्ह हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्याच्याशी स्वराज्य संघटनेचा काहीही संबंध नाही. स्वराज्यच्या वतीने आमच्या त्यांना शुभेच्छा असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com