‘अदानींचा फुगा फुटलाय, त्यात हवा भरण्याचं पाप करू नका; सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
Admin

‘अदानींचा फुगा फुटलाय, त्यात हवा भरण्याचं पाप करू नका; सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

गौतम अदानी यांच्या प्रकरणावरुन शिवसेनेचा अग्रलेख सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

गौतम अदानी यांच्या प्रकरणावरुन शिवसेनेचा अग्रलेख सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करण्यात आला आहे. सामनातून म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधकांनी एक असावं, अशी अपेक्षा सामनातून व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलंय. ममता यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांचाही छळ सुरु आहे. मात्र हिंडेनबर्गने फोडलेल्या फुग्याच्या बाबतीत ते गप्प आहेत. ममता व त्यांच्या पक्षाची लोकसभेत चांगली ताकद आहे. ते या प्रश्नी कुंपणावर बसून का बघत आहेत, असा सवाल अग्रलेखातून करण्यात आलाय. ममतांच्या प्रतिमेस व झुंजारपणास हे शोभणारे नाही. असे सामनातून म्हटले आहे.

मोदी सरकारविरोधात विरोधकांची वज्रमूठ हेच प्रखर हत्यार आहे. ते बोथट करण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरु आहेत यासाठी पैसे आले कुठून याचं उत्तर अदानींच्या फुटलेल्या फुग्यातून मिळेल, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. असे असले तरीही विरोधकांनी आता शांत न राहता एकजुटीने या विरोधात आवाज उठवायला पाहिजे. असा इशारा सामनातून देण्यात आला आहे.

यासोबतच अदानी यांच्या फुग्याला पहिली टाचणी राहुल गांधी यांनी लावली. राहुल गांधी यांनी संसदेत तसेच बाहेरही अदानी-अंबानी-मोदी संबंधांवर अनेकदा हल्ला केलाय. भारत जोडो यात्रेदरम्यान, अर्थतज्ज्ञ रघुरामन राजन गांधी यांच्याबरोबर चालले. त्यावेळीही राहुल गांधी म्हणाले होते, अदानी हा एक फुगा असून तो लवकरच फुटेल. मात्र आता या फुटलेल्या फुग्यात हवा मारण्याचं राष्ट्रीय कार्य नव्याने सुरु आहे. असे सामनातून म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com