समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू तर 4 गंभीर जखमी

समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू तर 4 गंभीर जखमी

समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जालन्यातील कडवंची गावाजवळ ही घटना घडली.

नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या इर्टिका कारला डिझेल भरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने हा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

संध्याकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी रस्त्याच्या कडेला पडलेल्या आर्टिका गाडीला क्रेनच्या सहाय्यानं काढण्यात आला. या अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com