Samruddhi Mahamarg : मुंबई-नागपूर प्रवास आता फक्त 8 तासांत; लवकरच महामार्गाचे उद्घाटन होणार
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. आता लवकरच हा महामार्ग सुरु करण्यात येणार आहे. हा प्रकल्प 2019 मध्ये सुरू झाला असून या एक्स्प्रेस वेचा पहिला टप्पा डिसेंबर 2022 आणि मार्च 2023 मध्ये अंशत: उघडण्यात आला होता आणि आता शेवटच्या भागाचे बांधकामही पूर्ण झाले आहे.
यातच मुंबई-नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी म्हणजे मुंबई ते नागपूर दरम्यान 14 तास प्रवास करावा लागत होता, मात्र आता हा प्रवास केवळ 8 तासात पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ देखील कमी होणार आहे.
या प्रकल्पामध्ये 1903 पूल आणि 76 किलोमीटर लांबीचे बोगदे आणि पूल बांधण्यात आले होते. या प्रकल्पाची 16 पॅकेजेसमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण 701 किमी लांबीचा रस्ता तयार करण्यात आला आहे. या महामार्गाचे उद्घाटन फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.