ताज्या बातम्या
Sandeep Deshpande Meet Varun Sardesai : हॉटेलमध्ये शिजतोय मनसे-सेना युतीचा बेत ?; संदीप देशपांडे-वरुण सरदेसाईंची मुक्त भेट
आज दादर येथील जिप्सी हॉटेलमध्ये मनसे नेते संदीप देशपांडे आणि शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांची भेट झाली.
मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे दोन पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा रंगू लागल्या असतानाच आज दादर येथील जिप्सी हॉटेलमध्ये मनसे नेते संदीप देशपांडे आणि शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांची भेट झाली. दोघांनी एकत्र नाश्त्याचा आनंदही घेतला. दोघांमध्ये मोकळ्या वातावरणात भेट झाली असून खेळीमेळीत बोलणं झाल्याचे दिसून आले. दरम्यान, याबाबत संदीप देशपांडे यांच्याशी संवाद साधला असताना त्यांनी येत्या 5 जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाच्या अनुषंगाने ही भेट झाल्याचे म्हटले आहे.