मनसे महायुतीत सामील होणार? संदिप देशपांडे म्हणाले...

मनसे महायुतीत सामील होणार? संदिप देशपांडे म्हणाले...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहेत. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. राज ठाकरे अमित शाहांची भेट घेणार आहेत. अमित शाहांच्या भेटीनंतर राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर संदिप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज साहेब काल दिल्लीला गेले आहेत ही गोष्ट खरी आहे. मला असे वाटतं येणाऱ्या काही तासांतच स्पष्ट होईल ते कशासाठी दिल्लीला गेलेत. कुणाला भेटणार आहेत. राज साहेब जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल हिंदुत्वाच्या हिताचा असेल मराठी माणसाच्या हिताचा असेल आणि पक्षाच्या हिताचा असेल. बाळा नांदगावकर साहेब आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. ते दिल्लीत गेलेत खासदार म्हणून तर आम्हाला आनंदच होईल.

राज साहेब ठाकरे आम्हाला जो आदेश देतील त्यानुसार आम्ही काम करू. महाराष्ट्राचं हित कशात आहे हे लक्षात ठेऊन राज साहेब निर्णय घेतील. असे संदिप देशपांडे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com