...तर सगळेच भस्मसात व्हाल; मनसेच्या वर्धापन दिनाचा टीजर लाँच
Admin

...तर सगळेच भस्मसात व्हाल; मनसेच्या वर्धापन दिनाचा टीजर लाँच

येत्या ९ मार्च रोजी मनसेचा वर्धापन दिन आहे.

येत्या ९ मार्च रोजी मनसेचा वर्धापन दिन आहे. नुकताच वर्धापन दिनाचा टीजर मनसेकडून लाँच करण्यात आला आहे. राज ठाकरेंच्या सभेकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले असते. यातच आता सुरु असलेल्या सत्तासंघर्षाबद्दल राज ठाकरे यांची अजून काहीच भाष्य केले नाही आहे.

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने पनवेलमध्ये राज ठाकरे यांची मुलाखत झाली त्यामध्ये राज ठाकरे यांनी सांगितले की, आपण कोणताही टीजर किंवा ट्रेलर न दाखवता थेट २२ तारखेला गुढी पाडव्याच्या दिवशी सिनेमा दाखवणार असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता राज ठाकरे गुढी पाडव्याला नेमकं काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हा टीझर सोशल मिडियावर शेअर केला आहे. याच राज ठाकरे यांचा आवाजातील व्हिडिओ आहे. यात महाराष्ट्र लढवय्या आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला जाण्याचा प्रयत्न करू नका. शिवरायाचा तिसरा नेत्र उघडला तर सगळेच भस्मसात व्हाल” असे शब्द आहेत. हा टीझर शेअर करुन संदीप देशपांडे यांनी “प्रतीक्षा नऊ मार्चची!”असे कॅप्शन दिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com