आमदार संदीप क्षिरसागर यांनी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्यावर साधला निशाणा

आमदार संदीप क्षिरसागर यांनी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्यावर साधला निशाणा

बीडचे आमदार संदीप क्षिरसागर यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्यावर निशाणा साधला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

ओंकार कुलकर्णी, बीड

बीडचे आमदार संदीप क्षिरसागर यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्यावर निशाणा साधला आहे. संदीप क्षिरसागर म्हणाले की, आम्ही सभागृहामध्ये सर्वच पक्षाचे आमदार बोलल्यानंतरसुद्धा जो मास्टरमाईंड आहे.

वाल्मिक कराडला अटक झाली नाही म्हणून सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे की आपण जोपर्यंत त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपण आंदोलन करणार. धनंजय मुंडे यांनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा.

लोकांची मागणी आहे त्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे. बाकीचे पण प्रकरण बाहेर आले पाहिजे. यापुढे अशी गोष्ट झाली नाही पाहिजे. जोपर्यंत ही अटक होत नाही आणि अटक झाल्यावरसुद्धा शेवटपर्यंत जिल्ह्याचे लक्ष जोपर्यंत यांना फासावर चढवत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. असे संदीप क्षिरसागर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com