चंद्रकांत खैरेंचं डोकं गोमूत्राने धुवायला पाहिजे; संदिपान भूमरे

चंद्रकांत खैरेंचं डोकं गोमूत्राने धुवायला पाहिजे; संदिपान भूमरे

शिंदे गटातील पैठणचे आमदार आणि मंत्री संदिपान भूमरे यांच्या नेतृत्वात सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पैठणमध्ये जाहीर सत्कार करण्यात आला.

शिंदे गटातील पैठणचे आमदार आणि मंत्री संदिपान भूमरे यांच्या नेतृत्वात सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पैठणमध्ये जाहीर सत्कार करण्यात आला. मात्र मुख्यमंत्र्यांचा ताफा ज्या रस्त्यावरून गेला, त्या रस्त्यावर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून रस्त्याचे शुद्धीकरण केले. याच पार्श्वभूमीवर रोहयो मंत्री संदिपान भूमरे यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

संदिपान भूमरे म्हणाले की, खैरेंचं डोकंच एकदा गोमूत्राने धुवायला पाहिजे. यासोबतच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संदिपान भूमरे यांच्या मतदार संघातला महत्त्वाकांक्षी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचं कंत्राट भूमरे यांच्या जावयाला मिळाल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना भुमरे म्हणाले की, ज्या कामाचा आरोप केला जातोय त्या कामाचं आणखी टेंडर निघालं नाही आहे. जावयाने टेंडर घेतलं तर अडचण काय आहे असा सवालही त्यांनीन विचारला आहे.

Lokshahi
www.lokshahi.com