खैरे प्रत्येक कामात वसुली करतात, त्यांनी तर किराणा दुकानदारांनाही...; संदीपान भुमरेंचा आरोप

खैरे प्रत्येक कामात वसुली करतात, त्यांनी तर किराणा दुकानदारांनाही...; संदीपान भुमरेंचा आरोप

राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहेत. दरम्यान, शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. शिवसेनेतील दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यात आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिंदे गटाच्या नेत्यांवर आणि आमदारांवर जोरदार टीका करत गंभीर आरोप केले आहेत. संजय शिरसाट पत्ते खेळतात, मंत्री संदिपान भुमरे दारु विकतात आणि अब्दुल सत्तार कोट्यवधी रुपये कमवून घर भरत असल्याचे गंभीर आरोप करत जोरदार टीका केली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता संदीपान भुमरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संदीपान भुमरे म्हणाले की, चंद्रकांत खैरेंनी आजपर्यंत अनेक कार्यकर्त्यांना मातीत घालायचे काम केले म्हणून आज ही परिस्थिती आली.

तसेच खैरे याचा एकच व्यवसाय लोकांना लुबाडायचे आणि टक्केवारी घ्यायचीय एकनाथ शिंदे साहेबांकडून 7 कोटीचा निधी आणला आणि तो पण विकला. खैरे हा वसुली बहाद्दर माणूस आहे. खैरे प्रत्येक कामात वसुली करतात. इतकच नाही तर त्यांनी किराणा दुकानदारांनाही सोडलं नाही. असे संदीपान भुमरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com