आमदार नितीन देशमुख यांचे हात आणि पाय पकडून पोलिसांनी उचलून नेले
Admin

आमदार नितीन देशमुख यांचे हात आणि पाय पकडून पोलिसांनी उचलून नेले

आमदार नितीन देशमुख यांची जल संघर्ष यात्रा पोलिसांनी रोखली असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आमदार नितीन देशमुख यांची जल संघर्ष यात्रा पोलिसांनी रोखली असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. जोपर्यंत पाणीप्रश्न सुटत नाही तोपर्यंत आंदोलन करत राहणार असल्याचे देशमुख म्हणाले. अकोला ते नागपूर त्यांनी पायीं पदयात्रा काढली होती. ते आज नागपूर मध्ये दाखल होणार होते. त्या आधी त्यांना नागपूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. ही यात्रा काढण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेतली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

इतर आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यानंतर देशमुख हे जमिनीवर झोपले. मात्र, काही पोलिसांनी देशमुख यांचे हात तर काहींनी पाय पकडून त्यांना उचलून नेले.

आमदार नितीन देशमुख यांचे हात आणि पाय पकडून पोलिसांनी उचलून नेले
भाजप आमदार राजेंद्र पाटनी यांचे दोन्ही पाय आणि हात छाटू; शिवसेनेचे विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळेंचे आव्हान
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com