सांगली मिरज रस्त्यावरील कारखान्यात स्फोट; दोन कामगार गंभीर जखमी

स्फोटाच्या आगीत दोन कामगार गंभीर भाजल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

मिरज येथील भोकरे कॉलोनी येथील समरीती इंटरप्राईजेस व दिया इंटरपजेस कारखान्यात स्फोट होऊन दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. फाउंडरीच्या मातीतून अल्युमिनियम वेगळे करण्याचे काम या कारखान्या मध्ये होते. आज मशीन मध्ये फाउंडरीच्या मातीतून अल्युमिनियम वेगळे करत असताना मशीन मध्ये स्फोट झाला. यावेळी मशीन वर काम करणारे कामगार निरहू वय 47 आणि विजय कुमार वय 46 हे गंभीर जखमी झाले आहेत मशीन जवळ ठेवलेल्या झिंक पोत्याना आग लागली होती या स्फोटात जखमी झालेल्या कामगारांना गंभीर भाजल्याने तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मिरज महात्मा गांधी चौकी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याबाबत स्फोटाचे नेमके कारण समजू शकले नाही, पण झिंक मिश्रीत माती आणि अल्युमिनियम यांचे मिश्रनाने हा स्फोट झाला. असल्याचा प्राथमिक कयास आहे एकाने 600 किलो झिंक मिश्रित माती या कंपनीत माल पाठवला होता असे कामगारानी सांगितले आहे पुढील तपास महात्मा गांधी चौकी पोलीस करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com