Sangli Chor Ganpati : सांगलीच्या 'चोर गणपती'ची प्रतिष्ठापना; नाव कसं पडलं?

Sangli Chor Ganpati : सांगलीच्या 'चोर गणपती'ची प्रतिष्ठापना; नाव कसं पडलं?

श्री गजानन हे सांगलीचे आराध्य दैवत असून सर्व धर्मियांचे ते श्रद्धास्थान आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

संजय देसाई, सांगली

श्री गजानन हे सांगलीचे आराध्य दैवत असून सर्व धर्मियांचे ते श्रद्धास्थान आहे. चोर गणपती बसवण्याची येथे शतकाची परंपरा आहे. गणेश चतुर्थीच्या चार दिवस आगोदर चोर गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. श्री गणपती पंचायतन संस्थानच्या सांगलीतील प्रसिध्द गणपती मंदिरात हा चोर गणपती बसवला जातो. 

 गणेश चतुर्थीला सर्वत्र थाटामाटात गणेशाचे आगमन होते. सांगलीत मात्र दोन दिवस अगोदर चोर गणेशाचे आगमन होते . कोणालाही माहिती न पडता गणेशाची स्थापना होते. या प्रथेला चोर गणपती म्हणतात. भाद्रपद  शुद्ध  प्रतिपदा ते  भाद्रपद  शुद्ध पंचमी या काळात  हा  गणपती  बसवला  जातो. 

सांगली मध्ये गेल्या दीडशे वर्षापासूनची ही परंपरा सुरु आहे, चोर गणपतीची मूर्ती कागदी लगदयापासून बनवली जातो. हा दीड दिवस गणपती असतो. या मूर्तीचे विसर्जन केले जात नाही. या मूर्तीला सुखरूप ठिकाणी ठेवले जाते. त्याचे जतन केले जाते . या गणपती बरोबरच गणेश चतुर्थीला नियमित गणेशाची स्थापना होते. या ठिकाणी पाच दिवस आराधनेचा सोहळा असतो. विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या या सोहळ्यासाठी अनेक राज्यातील शेकडो भाविक येतात. या ठिकाणचे गणपती मंदिर प्रसिध्द असून हा नवसाला पावणारा गणपती आहे असे मानले जाते. या परिसरातील एकात्मता मंदिर असून येथे सर्व धर्मियांचे पवित्र धर्म ग्रंथ ठेवण्यात आले आहेत. पाचव्या दिवशी मिरवणुकीने येथील गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com