Mahesh Tapase
Mahesh TapaseTeam Lokshahi

सांगली साधू मारहाण प्रकरण, हिंदुत्ववादी म्हणणारे सरकार गप्प का? -महेश तपासे

सांगली येथे चार साधूंना काही जणांनी मारहाण केले. त्यानंतर याचे राजकीय पडसाद देखील उंटू लागले आहेत.

अमजद खान, कल्याण : सांगली येथे चार साधूंना काही जणांनी मारहाण केले. त्यानंतर याचे राजकीय पडसाद देखील उंटू लागले आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपसे यांनी शिंदे फडणवीस सरकारला लक्ष केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात आम्ही हिंदुत्ववादी सरकार आहोत, भारतीय जनता पार्टी म्हणते हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रात बंड घडवून आणलं, हिंदुत्ववादी सरकारमध्ये साधूना मारहाण कशी होते हा प्रश्न निर्माण झालाय, भाजप गप्प का? मुख्यमंत्र्यांना साधू महाराणी बाबत प्रश्न का विचारत नाहीत ? भाजप आणि शिंदे गटाचा हिंदुत्व फक्त राजकारणापुरताच मर्यादित आहे का? या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. असा प्रश्न महेश तपासे यांनी निर्माण केला आहे.

पुढे म्हणाले, साधूंना मारहाण कशामुळे झाली, हिंदुत्ववादी म्हणणार सरकार आहे ते या प्रकरणात गप्प का? कुठल्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले हे देखील जनतेच्या समोर आले पाहिजे अशी मागणी महेश तपासे यांनी केली आहे.

Lokshahi
www.lokshahi.com