समृद्ध बनवणाऱ्या सांगलीच्या ऐतिहासिक 'आयर्विन ब्रिजला' 93 वर्षे पुर्ण

समृद्ध बनवणाऱ्या सांगलीच्या ऐतिहासिक 'आयर्विन ब्रिजला' 93 वर्षे पुर्ण

सांगली शहर आणि जिल्ह्याला समृद्ध, सधन बनवणारा आणि ऐतिहासिक ठेवा असणारा "आयुर्विन पूल"आता 93 वर्षे पूर्ण करत असून 94 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
Published by :
shweta walge

संजय देसाई, सांगली: सांगली शहर आणि जिल्ह्याला समृद्ध, सधन बनवणारा आणि ऐतिहासिक ठेवा असणारा "आयुर्विन पूल"आता 93 वर्षे पूर्ण करत असून 94 व्या वर्षात पदार्पण करत आहे. सांगलीच्या जडणघडनेचा साक्षीदार आणि संथ वाहणाऱ्या कृष्णामाईच्या कवेत डौलाने उभा असणारा देखणा "आयर्विन पूल" आजही पाहणाऱ्याला भुरळ घालतोय.

कृष्णाकाठी वसलेल्या सांगली शहराला 1914 मध्ये महापूराचा फटका बसला. त्यानंतर सांगलीचे संस्थानिक पटवर्धन सरकारांनी याठिकाणी पूल उभारण्याचा निर्णय घेतला. त्यावेळीच्या सांगली स्टेट असेंम्बली मध्ये यावर चर्चा होऊन, निधी जमवून या पूल उभारणीला प्रत्यक्ष सुरुवात झाली. 14 फेब्रुवारी 1927 मध्ये या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली. 18 नोव्हेंबर 1929 मध्ये सर्वार्थाने पूर्ण झाला. सांगली शहरातील काळा दगड आणि कर्नाटकातील गोकाक येथील लाल दगड, शिसे यांचा वापर करून हा पूल बांधण्यात आला. तर हा पूल उभारताना यावर रेखीव आणि देखण्या रुपाची हस्तकला ही करण्यात आली. 12 कमानींच्या जोरावर हा भव्य दिव्य पुल उभारला आहे. तर या पुलाला त्यावेळी 6 लाख 50 हजार रुपये इतका खर्च आला. आणि पटवर्धन संस्थानिकांनी मोठ्या थाटामाटात या पुलाचे उद्घाटन भारताचे ब्रिटिश राजवटीचे तत्कालीन गव्हर्नर एडवर्ड फ्रेडरिक लेंडीली वुड यांच्या असणारे आयर्विन या पदाच्या नावावरून आयर्विन पूल असे नाव देण्यात आले.

अश्या ऐतिहासिक आयर्विन पुलाला 92 वर्षे पूर्ण होत असून अनेक महापूरांना तोंड देत आजही मोठया दिमाखात हा पूल उभा आहे.हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी शासनाच्यावतीने या पुलाला समांतर पर्यायी पूल देखील आता कृष्णा नदीवर उभारण्यात येत आहे.

समृद्ध बनवणाऱ्या सांगलीच्या ऐतिहासिक 'आयर्विन ब्रिजला' 93 वर्षे पुर्ण
ट्विटर कर्मचाऱ्यांनी दिला सामूहिक राजीनामा; कंपनीने केली सर्व कार्यालये बंद
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com