ताज्या बातम्या
Sanjay Dina Patil: पत्रकार परिषदेला अनुपस्थित का? संजय दिना पाटील यांची 'लोकशाही'ला Exclusive माहिती
संजय दिना पाटील यांनी उद्धव ठाकरेंसोबत असल्याचा खुलासा केला. दिल्लीतील पत्रकार परिषदेत अनुपस्थित राहण्याचं कारण सांगितलं. अधिक वाचा लोकशाही मराठीवर.
मी उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचा खुलासा खासदार संजय दिना पाटील यांनी केला आहे. अरविंद सावंतांच्या दिल्लीतील घरी झालेल्या पत्रकार परिषदेला संजय दिना पाटील दिसले नाही. त्यांना लोकशाही मराठीने संपर्क केला असता त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं म्हटलं आहे.
त्याचबरोबर संजय दिना पाटील घरगुती विवाहसोहळ्यासाठी मुंबईला गेले होते, आणि दिल्लीत पोहोचताच अरविंद सावंतांची भेट घेणार असल्याचं त्यांनी लोकशाही मराठीशी बोलताना सांगितलं आहे. तसेच आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.